V



V ACADEMY, PRAKASH NAGAR, BARSHI ROAD, LATUR

व्ही. अकॅडमी हि प्रयत्नशील आहे आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी .स्पर्धेच्या च्या या युगात आपल्या पाल्यास स्पर्धक बनावेच लागेल. आपला पाल्य सक्षम स्पर्धक बनावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

दिनविशेष 5 ऑक्टोबर 2015

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

दिनविशेष 5ऑक्टोबर 2015

हा या वर्षातील २७८ वा (लीप वर्षातील २७९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९८:डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर
१९९५:कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर
१९८९:मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९६२:’डॉ. नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.
१९५५:पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९१०:पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१८६४:एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७५:केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री
१९३२:माधव आपटे – क्रिकेटपटू
१९२३:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)
१९२२:शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २६ एप्रिल१९८७)
१९२२:यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक (मृत्यू: १० मे १९९८)
१८९०:किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते. (मृत्यू: ? ? ????)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११:स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)
१९९७:चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
१९९२:बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
१९९१:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म: ३ एप्रिल १९०४)
१९९०:राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३). त्यांचे ’वीर हमीद’, ’निशीथ’, ’चितोड की चिता’ इ. काव्यसंग्रह, ’एकलव्य’ हे खंडकाव्य, ’पृथ्वीराज की आँखे’, ’रेशमी टाई’, ”सप्तकिरण’, ’शिवाजी’ इ. एकांकिका संग्रह व अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. (जन्म:१५ सप्टेंबर १९०५)
१९८३:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (जन्म:२८ जुलै १९०७)
१९८१:भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा