V



V ACADEMY, PRAKASH NAGAR, BARSHI ROAD, LATUR

व्ही. अकॅडमी हि प्रयत्नशील आहे आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी .स्पर्धेच्या च्या या युगात आपल्या पाल्यास स्पर्धक बनावेच लागेल. आपला पाल्य सक्षम स्पर्धक बनावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

गुणवत्ता म्हणजे काय ?

गुणवत्ता  म्हणजे काय ?
                                           प्रश्न छान आहे न…. अनेकजण यावरती आप आपल छानस मतही मांडतील ।

कदाचित यावर वाद हि निर्माण होतील … पण नेमकं वादाचा विषय काय असेल या विषयी मला उत्सुकता

लागून राहते. ज्या अभ्यासाला आपणही बालवयात घाबरायचो अर्थात तो हि आपणास झेपत नव्हता तरीही तोच विषय व तोच अभ्यास आपल्या मुलांनी केलाच पाहिजे हा हट्टा हास  आज आपण सहजतेने बाळगतो.

    नाही ! नाही ! आपला  गैरसमज होऊ देवू नका ज्यांना तो विषय व अभ्यास जमला   त्यांच्याविषयी मला खूपच आदर आहे. मुळात अशानीच गुणवत्तेबद्दल बोलण  योग्य ठरेलही. कारण नेहमी गुणवत्तेबद्दल सगळीकडे बोलल जात खर पण नेमक या विषयात सहभागी कोण असत हा चिंतनाचा विषय असतो. आपल्या विध्यार्थी वयात गुणवत्ता सिध्द करून आज उच्च पदे सांभाळणारी  भरपूर जण आपल्यात असताना आपण मात्र गुणवत्ता म्हणजे काय ? या विषयी तासनतास विचारमंथन करीत असतो. 

                                            गुणवत्ता म्हणजे मार्क किंवा अधिक गुण घेणे नव्हे तर मग कशाला म्हणायचं गुणवत्ता. कारण गुण  मिळविल्याशिवाय आपण गुणवान  होवू का … एखादा विद्यार्थी चांगले गुण मिळवलाच नाही तर  त्याला कुणी गुणवंत म्हणताना  नाही ऐकल  … नेहमी खूप गुण प्राप्त केलेल्यांचाच सत्कार केला जातो. सचिन तेंडुलकरला पण स्वताची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूपच रन काढावे लागतातच कि … म्हणजे किती रन काढले यावर  सचिन चांगला खेळाडू गणला जातो तसे  विद्यार्थी किती गुण मिळवतो यावर त्यांची गुणवत्ता ठरते नाही का ? 
                   आणि हो ,,, बर का 
                                                    जर ज्यास्त गुण घेणे याचा संबध गुणवत्तेशी नसेल तर मग ज्यास्त गुण मिळालेल्यानाच नोकरी का ?
                       
                                 शेवटी आपण नोकरीसाठीच सगळ काही करतो ना …. मग गुणांशिवाय नोकरी नसेल तर मग गुण महत्त्वाचे कि गुणवत्ता … जाता जाता फक्त इतकंच बोलायचं होत कि गुणवत्ता या शब्दातून आपणास अपेक्षित काय व ती बाळगण्याने आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळते काय …… 
   
                             क्षमस्व :

भारताचा नकाशा ( मराठी )

महाराष्ट्राचा नकाशा ( मराठी )









भारताचा नकाशा ( मराठी )




भारताचा नकाशा ( मराठी )

सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

ध्वनीदर्शक शब्द

ध्वनीदर्शक शब्द

घुबडांचा - घुत्कार     मोरांचा - केकराव   डासांची - भुणभुण 

गाईचे - हंबरणे          रेड्याचे - रेकने      हत्तीचे - चीत्कारणे 

बेडकाचे  -  डरावने    वाघाची -डरकाळी   बैलगाडीचा   -खडखडाट 

जात्याची  - घरघर    विमानाची  -घरघर   तलवारीचा  -खनखनाट  

पैजनाची  -छुमछुम   चिमणीची  -चिवचिव कबुतराचे   -घुमने 

हंसाचा  - कलरव         भूग्यांचा -गुंजारव    कुत्र्याचे  - भुंकणे 

गाढवाचे -ओरडणे    घोड्याचे  -खिंकाळणे   माकडाचा  -भूभू:कार 

सिंहाची  -गर्जना            विजेचा  -कडकडाट    पानांची  -सळसळ

घड्याळाची- टिकटिक    कावळ्याची-कावकाव

कोकिळेचे  -कुहुकुहु      सुतारपक्षचा  -कलकलाट       मधमाशा चा  -गुंजारव 

 म्हशीची  -रेकने           बैलाचे - डरकणे      सापांचा  -फुत्कार 

कोल्यांची - कोल्हेकुई    घंटेचा -घनघनाट        नाण्यांचा -छन छनाट 

विजांचा  -कडकडाट     चाकांची -खडखड     पखांची -फडफड 
                              






































































































































































रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

महत्त्वाचे दिनविशेष

महत्त्वाचे दिनविशेष 
१ जानेवारी - नववर्ष दिन 
३ जानेवारी - बालिका दिन 
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन 
३० जानेवारी - हुतात्मा दिन ( म.गांधी पुण्यतिथी )
२९ फेब्रुवारी - लीप वर्ष 
८ मार्च - आंतराष्ट्रीय महिला दिन 
१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 
१ मे - महाराष्ट्र दिन / कामगार दिन 
७ जून - मृग नक्षत्र सुरुवात 
१ ऑगस्ट - लो. टिळक पुण्यतिथी 
१५ ऑगस्ट - स्वातंत्र दिन 
५ सप्टेंबर - शिक्षक दिन 
२ ऑक्टोंबर - म.गांधी जयंती / लालबहादूर शास्त्री जयंती 
१४ नोव्हेंबर - पं. नेहरू जयंती ( बालदिन )
२७  नोव्हेंबर - महात्मा फुले पुण्यतिथी 
७ डिसेंबर - धव्ज दिन 
२५ डिसेंबर - नाताळ 





























































ALPHABETS


खालील प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय शोधा. 
१. खालील पैकी कोणती अक्षरे सारखी नाहीत. 
१. m-m  2. p-q  3. n-n 4. z-z
२. वेगळ्या ध्वनीने सुरु होणारा शब्द कोणता ?
1. mat    2. bat    3. bad   4. back
३. खालील पैकी  कोणते अक्षर लहान लिपीतील आहे. 
1. t    2. M   3. P  4.  V 
४. खालीलपैकी  कोणती अक्षरे वर्णानुक्रमे आहेत. 
1. bedeg  2.  mnoqp 3. opqrs  4. defgh


ANSWER KEY:
1- 2   2- 1  3- 1  4-3

गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५

Tense Chart

Tense Chart


भारताचा नकाशा ( राज्य व राजधान्या )


भारताचा नकाशा ( राज्य व राजधान्या )




आपला पाल्य आणि आपण

आपला पाल्य आणि आपण  :

         १ . आपला पाल्याचे भविष्य हे आपल्या विचारसरणीवर तसेच घरातील वातावरणावर हि तितकेच अवलंबून असते हि बाब अलीकडे लक्षात आली आहे. 
     
         २. आपल्या विचारांचे,  आचारांचे अनुसरण आपली मुल करतात हे आपणास माहिती असणे आवश्यक आहे. 
 
          ३. आपली राहणी, आपले शेजारी , आपल्या घरासभोवातीचे  वातावरण तसेच घरातील माणसांची बोलणी या सर्वांचा परिणाम निश्चितपणे आपल्या मुलावरती होणे साहजिकच म्हणावे लागेल . 

         ४.  आपण एक  सुशिक्षित व सुजाण पालक म्हणून या सर्व गोष्टिंकडे लक्ष  देणे गरजेचे आहे. आपण सतर्क असायला पाहिजे ते या बाबतीत ………… 

                  आपल्या मुलांचे मित्र ,,, त्यांचे खेळण्याची ठिकाणे , त्यांच्या मित्रांचे वय, त्यांच्या मित्रांचे मित्रं या विषयी आपणास माहिती असणे गरजेचे आहे. 
                 
                  आपले   मुल त्यांच्या  वयानुसार वर्तन करते कि  अपेक्षित नसलेले वर्तन करीत आहे याचे निरीक्षण करावे . जर तसे काही अनपेक्षित दिसून आल्यास त्वरित त्याच्या मित्रांविषयी माहिती मिळविणे अधिकच चांगले ठरेल. 
 
       ५. आपल्या  मुलाच्या खाण्यापिण्याच्या सवयीचे पण आपण निरीक्षण केले पाहिजे.  

       ६  वेळोवेळी तो शिकत असलेल्या शाळेत, क्लासेस व अन्य शिकवणी वर्गास वेळोवेळी भेट  देवून त्याच्या उपस्थिती विषयी माहिती मिळवा. 

              किमान इतक्या बाबी जरी आपण वेळोवेळी पाळल्या तर आपला पाल्य सतर्क होइल व चुका  करण्याचे टाळेल.       

        

संख्यांचा लहान - मोठेपणा

                  संख्यांचा लहान - मोठेपणा 

   एक अंकी संख्येत एकच अंक असतो. 


                      लहानात लहान संख्या    मोठ्यात मोठी संख्या 
   एक अंकी            0                                      9
  
   दोन अंकी           10                                   99

   तीन अंकी         100                                  999

   चार अंकी         1000                                9999
  
   पाच अंकी         10000                             99999

   सहा अंकी        100000                          999999


                                 -----  लोकरे ए. एच 

     

इंग्रजीची भीती का वाटते ?

इंग्रजीची भीती का वाटते ?

विध्यार्थी मित्रानो  …। 
          एखादी नवीन भाषा शिकायची म्हंटल कि अगोदर आपणास त्या भाषेच्या मुळाक्षरांची माहिती असणे तितकेच महत्त्वाचे असते. 
      भाषेवर प्रभुत्त्व मिळवायचे असेल तर ती अगोदर आपणास ऐकणे म्हणजेच श्रवन करणे गरजेचे असते . 
इंग्रजीच्या बाबतीत पण असच आहे मित्रानो… 
कोणतीही भाषा अवगत करण्यासाठी तिचे श्रवन   केले पाहिजे …. 
          अधिक ऐकण्याने भाषेचे शिष्टाचार आपणास अवगत होतात. 
जर भाषा  लवकरात लवकर कमी  वेळात बोलायला शिकायची असेल तर ती भाषा जास्तीत ज्यास्त ऐका. 

                   चला मंग ऐकुया ज्यास्तीत ज्यास्त इंग्रजी बातम्या, इंग्रजी कविता अन करूया सराव बोलण्याचा. 
 इंग्रजी वर्तमानपत्र :
                                   TIMES  OF INDIA   

                                     
      epaper.timesofindia.com



   महत्वाचे 

मुलांनो  आपणास इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच येणाऱ्या स्पर्धेच्या युगात आपण यशस्वी 

होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते .  आपली गरज लक्षात घेवून आपणास आवश्यक ते मार्गदर्शन 

करण्यासाठी  V Academy आपल्या सोबत आहे 


V ACADEMY




नमस्कार  पालक व  विद्यार्थी  मित्रानो 
V Academy  हि  लातूर मधील एक रेगुलर विषय व स्पर्धा परीक्षा विषयांची तयारी करून घेणारी Academy आहे . आपला पाल्य येणाऱ्या स्पर्धेच्या युगात स्पर्धक म्हणून उतरताना  त्याची तयारी असणे तितकेच महत्त्वाचे असते. आपला पाल्य वेळीच या स्पर्धेसाठी सज्ज झाला पाहिजे नाहीतर वेळ आणि वय या वर  आपणास नियंत्रण ठेवता आल नाही अन कदाचित कदाचित ते शक्य हि नसेल . म्हणून वेळीच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य तो  निर्णय घेणे अपेक्षित असते.  

 संचालक :
    पी . एस . जाधव